यावल

यावलचा सुपुत्र फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य 

पुणे– यावल येथील रहिवासी डॉ. नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सूत्रे स्वीकारली. विद्येचे माहेरघर असलेल्या ऐतिहासिक व सुप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य पद यावलकरांना मिळाल्याने शहरासह तालुकावासीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. डॉ. कुळकर्णी हे सरस्वती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक स्व. एम.बी .कुलकर्णी यांचे सुपुत्र तथा नाशिक येथील लोकमतचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

डाॅ कुळकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण येथील तारकेश्र्वर विद्या मंदिरात पुर्ण करून येथील माध्यमिक शिक्षण येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत तर जळगावच्या मू.जे.महाविद्यालयातून पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करून , पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण व पी. एच. डी . केल्यानंतर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. काही कालावधीतच या महाविद्यालयात उप प्राचार्य पदाची जबाबदारी यशस्वपणे सांभाळल्यानंतर आता त्यांच्याकडे प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या यशामागे वडील स्व. मधुकर बळवंत कुळकर्णी.आई साधनाताई यांचा आशीर्वाद तर पत्नी डॉ.रेवती कुळकर्णी यांसह कुटूंबियाची प्रेरणा असल्याचे डॉ. कुळकर्णी यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे