जळगाव

जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहर तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षारोपण

जळगाव – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षरोपण करण्यात आले सुरुवातीला जिल्हाध्यक्ष लीना पवार व शहराध्यक्ष मनीषा पाटील यांनी प्रतिमा पूजन केले तसेच कांचन पाटील, सुचिता पाटील यांनी जिजाऊ वंदना म्हटली. डॉ जयश्री भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट उलगडून दाखविला. त्यानंतर अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले यात कडुलिंब, पिंपळ, चिंच, आवळा, बेहडा ,करंज, जांभूळ, शिसम ही वृक्ष लावण्यात आली.

सूत्रसंचालन मीनाक्षी पाटील यांनी तर आभार अर्चना पाटील यांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष लीना पवार, शहराध्यक्ष मनिषा पाटील, कार्याध्यक्ष सुचिता पाटील , मिनाक्षी पाटील सचिव कांचन पाटील,डॉ जयश्री देवरे, चारुशीला पाटील, अर्चना पाटील, नीता वानखेडकर, आशा मौर्य, विजया पांडे, वंदना मंडावरे, रामकृष्ण पाटील व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे