जळगाव

यावलला नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

१३०रुग्नांची तपासणी---३५ रुग्णावर शस्त्रक्रिया

यावल (प्रतिनीधी)- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने येथील तालुका भाजपाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरा चे आयोजन केले होते. या शिबिराचे आयोजन आश्रय फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांचे येथील जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये केले होते या शिबिरात यावल -रावेर तालुक्यातील एकूण १३०. रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर ३५ पात्र रुग्णांना जळगाव येथील कांताई नेत्रालयात शस्त्रक्रिये करिता रवाना करण्यात आले. आश्रय फाउंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या-येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री हिरालाल चौधरी तर उद्घाटन येथील बाजार समिती चे सभापती श्री. हर्षल पाटील यांनी केले.

शिबिरात युवराज देसार्डा यांनी रुग्नांना मार्गदर्शन केले तर नेत्र चिकित्सक डॉ वैभव शिंदे व सहायक विनोद पाटील यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. या कार्यक्रमांची प्रस्तावना आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी केले. . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री हिरालाल चौधरी तर उद्घाटन स्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती यावल चे सभापती श्री. हर्षल पाटील हे होते. आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे,किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष , नारायणबापू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौं सविताताई भालेराव, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे ,सरचिटणीस , विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, किशोर कुरकर्णी, हेमराज फेगडे , बाजार समीती संचालक राकेश फेगडे , सागर कोळी, व्यंकटेश बारी , .मनोज बारी, रितेश बारी इ. उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे