जळगाव

आर एम बी जळगाव, लघु उद्योग विकास बँक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सैयुक्त विद्यमाने ‘बिझीनेस समिट २०२३’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव – रोटरी इंटरनॅशनल विविध शाखांपैकीच एक ‘ रोटरी मिन्स बिझीनेस जळगाव चॅप्टर ‘ ला जळगांवला नुकतीच सुरुवात झाली असून आर एम बी जळगाव, लघु उद्योग विकास बँक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सैयुक्त विद्यमाने ‘बिझीनेस समिट २०२३’ आयोजन करण्यात आले आहे.

याच रोटरी मिन्स बिझीनेस जळगाव चॅप्टर तर्फे ‘उत्तर महाराष्ट्रातील पहिले बी टू बी बिझिनेस समिट २०२३’ चे आयोजन भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या (MACCIA) सैयूक्त विद्यमाने येत्या दिनांक ४ नोव्हेंबर रोजी, हॉटेल प्रेसिडेंट येथे करण्यात येत आहे. या समिट निमित्त माहितीपूर्ण स्टॉल्स देखील असतील. या समिट करीता दीपक बिल्डर्स अँड डेव्हलोपर्स हे मुख्य प्रायोजक असून सातपुडा ऑटो व फोकस ह्यंदाई हे सह प्रायोजक आहेत. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव विकासाबाबत मार्गदर्शन करणार असून ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडसट्रीज अँड अग्रिकल्चर हे मार्गदर्शन करणार असून भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे उप प्रबंधक मनोजकुमार सहयोगी यांचे देखील विविध प्रोत्साहनपर योजना या विषयावर विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रसंगी माहितीपूर्ण सेमिनार देखील आयोजित करण्यात आले आहे. ज्यात विविध बँका, महामंडळ त्यांच्या तर्फे राबविणाऱ्या योजनांची माहिती देणार आहेत. हे समिट विविध उद्योग व सेवा क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिक यांच्या करीता पर्वणी ठरणार असल्याची माहिती दीपककुमार पाटील यांनी हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव डॉ राहुल भन्साळी, खजिनदार स्वप्नील जाखेटे, जनसंपर्क संचालक मनीष पात्रीकर, भद्रेश शाह, उपस्थित होते.

सर्व संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी उपस्थित राहावे: जिल्हाधिकारी.

उत्तर महारष्ट्रातील पहिल्या आर एम बी बिझिनेस समिट २०२३ ला सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील उद्योजक जिल्हा – उद्योजक भारत या संकल्पनेला साकार करु या, याकरिता आवर्जून उपस्थित रहा व उत्सफूर्तपणे सहभागी व्हा असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे