यावल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी अतुल पाटील यांची नियुक्ती.

यावल – येथील माजी नगराध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष रविद्र भैय्या पाटील यांचे स्वाक्षरीने पत्र नुकतेच पाटील यांना देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या आदेशाने सदर नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका व गावांमध्ये पक्षाचे विचार व धेय्य धोरण पोहचवून जनतेच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी विश्वास निर्माण करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अतुल पाटील यांच्या नियुक्तीचे माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री अरूण भाई गुजराथी, माजी आमदार अरुण पाटील,माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष सौ रोहिणी ताई खडसे, प्रा. सुनील नेवे, यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे