यावल शहरात पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बाेगस डॉक्टरास पकडले, यावल पोलिसात केला गुन्हा दाखल
यावल : शहरातील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलात वैद्यकीय पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टर संदर्भातील गोपनीय माहिती बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधणाऱ्या समितीला मिळाली होती व या समितीने त्या ठिकाणी पंचांसह जाऊन तपासणी केली आणि संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन केले व संबधीता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्य मार्गाला लागून भुसावळ टी पॉइंट जवळ नगरपालिकेचे व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलाच्या एका गाळ्यात कुठल्याचं प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना डॉ. बिजन नीमचंद रॉय राहणार धनगरवाडा, यावल हा बंगाली डॉक्टर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करताना करत आहे अशी माहिती तालुकास्तरीय बोगस वैद्यकीय व्यवसाय शोधाणाऱ्या समितीला मिळाली होती. तेव्हा समीती सदस्य तथा तालुका आरोग्य अधिकारी राजू याकुब तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, शकील तडवी, अमीत तडवी, पंच डॉ. सतीष अस्वार, डॉ. धीरज पाटील यांच्यासोबत पोलिसांची मदत घेऊन सदर डॉक्टराकडे छापा टाकण्यात आला व तेथे डॉ. बिजन रॉय हा आपल्याकडे कुठल्याच प्रकारची मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची प्रमाणपत्र व इतर काही पदवी नसतांना बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले व त्याच्याकडे ऍलोपॅथी, अँटिबायोटिक्स सह विविध प्रकारचे औषधी मिळून आले तर त्या ठिकाणी दहिगाव येथील एक रुग्ण देखील उपचारासाठी आला होता मागील दोन दिवसापासून तो मुळव्याध वर या ठिकाणी उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले तर या डॉक्टरकडे विविध प्रकारचे वैद्यकीय औषधे देखील अनधिकृत पणे मिळून आले तेव्हा संबंधित डॉक्टर विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तालुका आरोग्य अधिकारी राजू तडवी यांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहे.