आरोग्य व शिक्षणजळगावमहाराष्ट्र

मान्यवरांच्या उपस्थितीत वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन संपन्न..

समाजाचं देणं देणारे आरोग्यमंदिर वृध्दिंगत व्हावं - ना.गुलाबराव पाटील

शहराने परिवाराला दिलेल्या संपन्नतेतून उतराई होण्यासाठी आरोग्यमंदिराची उभारणी – ॲड.नारायण लाठी

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात सर्व सुविधांयुक्त असणारे अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा मानस घेऊन लाठी व सोमाणी परिवाराच्या शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि.च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मान्यवरांच्या हस्ते आज (दि.२४) सकाळी ११ वाजता उद्‌घाटन संपन्न झाले.

या उद्‌घाटन समारंभाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, पद्मश्री ॲड.उज्वल निकम, माजी मंत्री सुरेशदादा जैन, चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, जिल्हा सरकारी वकील ॲड.सुरेंद्र काबरा, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, महाराष्ट्र गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा, डॉ.ए.जी.भंगाळे, उद्योजक सुनिल झंवर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्यासह शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि. चे अध्यक्ष ॲड.नारायण लाठी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मुख्य इमारतीसोबतच कोनशिला अनावरण झाल्यानंतर क्रमशः मुख्य द्वाराचे फीत कापून उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या सिटी स्कॅन सेंटर, एम.आर.आय. कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष (ऑपरेशन थिएटर), कॅथ लॅब, आय.सी.यू. १ व २ तसेच जनरल वॉर्ड, फार्मसी याविविध सुविधा कक्षाचे उद्‌घाटन करण्यात येवून, हॉस्पिटलच्या वेबसाईटचेही अनावरण करण्यात आले.

सुरुवातीला प्रास्ताविक करताना ॲड.राहुल राठी यांनी वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इंटेसिव्हिस्टच्या सेवेसह अत्याधुनिक आय.सी.यु., मॉड्यूलर ग्लास ऑपरेशन थिएटर, हृदय शस्त्रक्रियेसाठी सुसज्ज कॅथलॅब, पूर्ण क्षमतेने कार्यरत असा आंतररुग्ण विभाग, वैद्यकियदृष्ट्या सुसज्ज व प्रशस्त रुम, वातानुकुलित जनरल वॉर्ड व शेअरींग रुम, २४ बाय ७ अपघात व आपत्कालीन विभाग, बाह्यरुग्ण विभाग, ३२ स्लाईस सी.टी.स्कॅन, स्ट्रेट टेस्ट टीएमटी, १.५ टेस्ला एम.आर.आय., सोनोग्राफी व पूर्णतः डिजीटल एक्सरे, पॅथॉलॉजी, फॉर्मसी, ॲडव्हॉन्स फिलिप्स अफिनिटी ७० २ डी इको, स्ट्रेन इमेजिंग, रिमोट हॉल्टर मॉनिटरींग, पूर्ण सुसज्ज कार्डियाक आयसीयू, २४ तास अँजियोग्राफी आणि अँजियोप्लास्टी सुविधांसह रक्तवाहिन्यांच्या इतर आजारांवर उपलब्ध सेवा व सुविधांची माहिती उपस्थितांना दिली.

मान्यवरांच्या मनोगतामध्ये बोलतांना केशवस्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष भरतदादा अमळकर म्हणाले की, शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी लाठी परिवाराने पूर्णतः विचार करुन या हॉस्पिटलची इमारत बांधली आहे. अद्ययावत सुविधा देण्यासोबतच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांचाही विचार करुन बांधलेली ही इमारत रुग्णालयाच्या वास्तूचा एक उत्तम नमूना आहे.त्यानंतर बोलतांना पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम यांनी नागरिकांच्या सुविधा देण्यासोबतच विविध आजारांवर एकाच छताखाली उपचार करणाऱ्या या आरोग्यमंदिराने वैद्यकिय सेवेचा आदर्श निर्माण करण्यासोबतच, यापुढे अधिकाधिक उपचारांवर उत्तम सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत वनिता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भविष्यातील उज्ज्वल वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्यात.

यावेळी बोलतांना माजी मंत्री सुरेशदादा जैन म्हणाले की, शहरासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना विविध आजारांवर उपचार उपलब्ध करून देणाऱ्या या आरोग्यमंदिराने अधिकाधिक प्रगती करत, विविध विमा योजना व शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ द्यावा. लाठी व सोमाणी परिवाराने घेतलेला हा आरोग्यसेवेचा वसा रुग्णांसाठी वरदान ठरावा.त्यानंतर ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांनी शुभेच्छापर मनोगतात ऐश्वर्यसंपन्न लाठी परिवाराने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात टाकलेले हे पाऊल शहराच्या प्रगतीपथावरील मोठे पाऊल असून, आता एवढ्यावरच न थांबता त्यांनी या आरोग्यमंदिराचे विस्तारीकरण करावे. यासोबतच त्यांनी वैद्यकिय सेवा व रुग्णसेवेसाठी शासकीय पातळीवरून देण्यात येणाऱ्या अनेक योजना व सुविधांची माहिती उपस्थितांना दिली.मान्यवरांच्या मनोगतामध्ये राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी बोलतांना सांगितले की, सोमाणी परिवाराशी माझे लहानपणापासून संबंध आहेत तर लाठी परिवाराशीही माझा ऋणानुबंध जुळला आहे. मी कोर्टाची पायरी ज्या दिवशी चढलो ती केस ॲड.नारायण लाठी यांनीच लढली होती. या दोन्ही परिवारांच्या परिश्रमातून साकारलेले हे आरोग्यमंदिराचे विस्तारीकरण होवून हा आरोग्यसेवेचे व्रत त्यांनी अविरत सुरु ठेवो ह्या शुभेच्छा व्यक्त केल्यात.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. नारायण लाठी सर्व सुविधांनी युक्त असं सुसज्ज व भव्य हॉस्पिटल उभारालं जावं ही माझ्या पत्नीची इच्छा होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. या प्रयत्नांना जळगावातील नागरिकांनी, हितचिंतकांनी पाठबळ दिलं, त्यांच्या सदिच्छांच्या जोरावरच हे आरोग्य मंदिर उभं राहिलं. फक्त स्वतःच स्वप्न प्रत्यक्षात आलं हे पाहण्यासाठी पत्नी हयात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सुसज्ज हॉस्पिटल जळगावातच का उभारलं हा प्रश्न अनेकांनी आम्हांला विचारला. या परिसरातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी आमच्या परिवाराला भरपूर दिलं. त्यांच्या पाठबळावर आमच्या परिवाराला संपन्नता प्राप्त झाली. या शहराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही जळगाव शहरात हे आरोग्य मंदिर उभारलं. या शहराने जे काही आमच्या परिवाराला दिलं ते परत करण्यासाठी आम्ही हा आरोग्यसेवेचा वसा हाती घेतला असून, या हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा देण्यासोबतच सर्वांच्या आवाक्यात येणारी रुग्णसेवा प्रामाणिकपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले तर आभार प्रदर्शन शनेश्वर हेल्थकेअर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.भूषण सोमाणी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा
WhatsApp Group