पाचोरा
पाचोरा पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैध गुटखा, गुटखा माफियांमध्ये खळबळ..
पाचोरा – रमजान ईद निमित्त पाचोरा तालुक्यातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना चाळीसगाव कडे एका वाहनातून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जात असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असून यात 22 लाखांचा बंदी असलेला अवैध गुटख्यासह आठ लाखाचे वाहन पकडले आहे.
या कारवाईत पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली असून या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यासह परिसरातील गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईसाठी पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंपी, सुनील पाटील, समीर पाटील यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.