यावल दि.१४ ( सुरेश पाटील ) – यावल तालुक्यात अवैध गौण खनिज / वाळू वाहतूक करणारी वाहने महसूल पथकाने पकडून जप्त केली होती त्यात अवैध गौण खनिज / वाळू वाहतूकदारांनी नियमानुसार दंडात्मक रक्कम न भरल्यामुळे यावल तहसील कार्यालयात गुरुवार दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व कायदेशीर पूर्तता करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव करण्यात आला त्यात महसूलच्या तिजोरीत ८ लाख २२ हजार रुपयाची भर पडल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली.
दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी यावल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आलेल्या अवैध गौण खनिज वाहनांचा लिलाव करण्यात आला.यामध्ये एकूण ६ वाहने लिलावा करिता ठेवण्यात आली होती त्यातील तीन वाहने लिलावामध्ये जाऊन एकूण रक्कम रुपये ८,२२,००० महसूल प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.