Exclusive : जळगावातील दोन दिग्गज नेत्यांची भेट अन…. राजकीय चर्चांना उधाण….

जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मंत्री सुरेश जैन यांचे समाज माध्यमांवर वायरल होणारे फोटो सध्या जळगाव चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते असताना जळगावत झालेल्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने तत्कालीन मंत्री सुरेश जैन यांना शिक्षा भोगावी लागली होती. मात्र जळगाव येथील एका विवाह सोहळ्यात दोघेही राजकीय कट्टर विरोधी एकाच व्यासपीठावर आणि एकाच सोप्यावर बसून गप्पा मारताना पाहायला मिळाले आहेत.

दोघांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले असून राजकारणात कुणीही कट्टर शत्रू किंवा मित्र नसतो याचं हे उदाहरण आहे. दोघांच्याही फोटोमुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या फोटोंची प्रचंड चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकारणावर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.