
जळगाव – मनपा च्या लिपिकास 5 हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबीने रंगेहाथ पकडले असून आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, महानगरपालिका जळगाव, व राजेश रमण पाटील, शहर समन्वयक, मनपा, कंत्राटी कर्मचारी असे त्यांचे नाव व पद आहे.
यातील तक्रारदार यांची कर सल्लागार संस्था असुन त्यांना एका संस्थेला नविन बसस्थानक, जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता टेंडर भरणे व त्या संबधीत काम तक्रारदार हे करीत होते. त्याप्रमाणे दि. 04/04/2025 रोजी सदर संस्थेतर्फे नविन बस स्थानक जळगाव येथील नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता मिळणेकामी महानगरपालीका जळगाव येथे टेंडर दाखल केले होते. तसेच टेंडर करिता 35,000/- रुपये अनामत रक्कम डी.डी.द्वारे महानगर पालीकेस भरली होती. परंतु सदरचे टेंडर सदर संस्थेला मिळाले नाही. म्हणुन टेंडर मिळणेकरिता भरलेली 35,000/- रुपये अनामत रक्कम परत मिळणेकरिता अर्ज तयार करून सदरचा अर्ज तक्रारदार यांनी दि. 29/07/2025 रोजी महानगरपालीका जळगाव येथे जमा करून अनामत रक्कमेच्या कामा संदर्भात लोकसेवक आनंद चांदेकर, लिपीक, महानगरपालीका जळगाव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी सदरची 35,000/-रुपये अनामत रक्कम परत मिळुन देण्याकरिता तक्रारदार यांचेकडे 5,000/-रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दि. 19/08/2025 रोजी ला.प्र.विभाग, जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक 19/08/2025 रोजी लाचमागणी पडताळणी केली असता यातील आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, महानगरपालिका जळगाव. यांनी तक्रारदार यांचेकडे महानगरपालीकेत भरलेली अनामत रक्कम मिळुन देण्याकरीता 5000/- रुपये लाचेची मागणी केली व सदरची लाचेची रक्कम राजेश रमण पाटील, शहर समन्वयक, मनपा, कंत्राटी कर्मचारी यांचेकडे देण्यास सांगितली. त्याचवेळी राजेश रमण पाटील, शहर समन्वयक, मनपा, कंत्राटी कर्मचारी यांनी आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, महानगरपालिका जळगाव. यांचेकरीता 5000/- रू. लाचेची मागणी केली. त्यानंतर सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार हे आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, महानगरपालिका जळगाव. यांना भेटले असता त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दिनांक 19/08/2025 रोजी पंचांसमक्ष लाचेची रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगुन स्वतः स्विकारली. म्हणून आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.आनंद जनार्दन चांदेकर, लिपिक, व राजेश रमण पाटील, शहर समन्वयक, मनपा, कंत्राटी कर्मचारी यांना ताब्यात घेतले
सदर कारवाई
जळगांव ला.प्र.वि. चे पोलिस उप अधिक्षक, योगेश ठाकूर,पोलिस निरीक्षक,हेमंत नागरे, ,GPSI/ सुरेश पाटील (चालक)पोना/बाळू मराठेपोकाँ/ भूषण पाटील यांनी केली.