आपत्तीग्रस्तांना रेडक्रॉसमार्फत संसार उपयोगी साहित्याची मदत
जळगाव – शहरातील औद्योगिक वसाहत मधील साईनगर येथील गॅस गळतीमुळे घडलेल्या दुर्घटनेतील आपत्तीग्रस्त परिवारांना संसार उपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.
जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत मधील साईनगर येथे तीन परिवार हे पार्टिशन च्या घरांमध्ये राहतात आणि एमआयडीसीतील कंपनीमध्ये मजुरी काम करतात. सकाळच्या वेळी गर्भवती महिला होती. अचानक शेजारील घरातील धुराचे लोट बाहेर येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बाहेर पळत जाऊन आरडाओरड केल्याने जवळच्या नागरिकांना बोलाविले. सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु लाकडी पार्टिशन लगेचच जाळून खाक झाले. घरात कुणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवित हानी मात्र टळली.
या तीनही परिवारांना रेडक्रॉसच्या आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी आणि आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला यांच्या मार्गदर्शनानुसार जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी जाऊन भांड्यांचा सेट, चटई, साड्या, बादली, हायजेनिक किट, ताडपत्री इत्यादी साहित्याची मदत केली. तसेच भविष्यात हि आवश्यकतेनुसार सहकार्य कण्याचे आश्वासन देण्यात आले.