यावल
नावरे गावाजवळ अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडले..
यावल ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील नावरे गावाजवळ मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर आढळून आल्याने यावल तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले.
आज दि.१८ एप्रिल २०२५ रोजी नावरे गावाजवळ अमोल रविंद्र माळी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर नंबर एमएच १९ ईजी ७९३९ मधून अवैध रेती वाहतुक करत असताना सचिन जगताप मंडळ अधिकारी साकळी भाग,संजय दंडगोले तलाठी साकळी,विजय पाटील तलाठी मनवेल,समीर तडवि कोतवाल शिरसाड आदीनि पकडून सदरचे वाहन पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालय यावल येथे जमा केले. यामुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.