15 हजाराची लाच भोवली : जिल्हा परिषदेचा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ACB च्या जाळ्यात..
जळगाव – जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यास 15 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून डॉ.जयवंत जुलाल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी , वर्ग – 1, असे त्याचे नाव व पद आहे.
यातील तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा परिषद जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांची सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्ती झालेली आहे. त्यांना प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉ.जयवंत जुलाल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे 30 हजार रुपयांची लाच मागणी केले बाबत तक्रारदार यांनी दिनांक 03/04/2025 रोजी ला.प्र.वी. जळगाव येथे तक्रार दिली होती.
दि.03/04/2025 व दिनांक 04/04/2025 रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी दरम्यान डॉ.जयवंत जुलाल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तक्रारदार यांना सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पालघर येथे प्रतिनियुक्तीचे ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठीचा प्रस्ताव सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांना सादर करण्यासाठी डॉ. सचिन भायकर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे नावे प्रथम 30 हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती तक्रारदार यांच्या कडून 15,000 रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली म्हणुन गुन्हा.
सदर कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, PI नेत्रा जाधव, Hc महाजन, PC सुर्यवंशी,Psi सुरेश पाटील चालक यांनी केली.