गुन्हेगारीजळगाव

मोबाईल चोरट्यास अवघ्या २४ तासाच्या आत अटक, जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी.

जळगाव – रात्री शतपावली करणा-या इसमाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. गजानन उर्फ बबन प्रकाश कोळी असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण करुन शतपावली करीत असतांना मानराज पार्क जवळील, नवजीवन सुपर शॉप समोरुन मोबाईलवर बोलत जात होते. पायी जात असताना पाठीमागुन एक मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात तीन आरोपीतांनी त्यांचा मोबाईल हातातुन हिसकावून पळुन गेले होते. सुनील भामरे यांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पथकाने शहरातील शिवकॉलनी परिसरातुन संशयित आरोपी गजानन ऊर्फ बबन प्रकाश कोळी वय-१९ रा. शिवकॉलनी स्टॉप जवळ, मटके विक्रीच्या ठिकाणी जळगांव मु.रा. साकेगांव ता. भुसावळ यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, त्याने हिसकवलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल काढून दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याचे साथीदार हे देखील निष्पन्न झाले असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथक काम करीत आहे.

पोलिसांनी संशयित आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि दुचाकी हस्तगत केली आहे. सदर गुन्हयाची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे यांनी केले असून गुन्हयाचा पुढील तपास पो.उप. निरी. शांताराम देशमुख व सिध्दार्थ सुरवाडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे