यावल

खानदेश वासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या अट्रावल येथील मुंजोबा यात्रेस प्रारंभ..

 

यावल (प्रतिनिधी) – खानदेश वासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या   तालुक्यातील   अट्रावल येथील, मुंजोबाच्या यात्रेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे देवस्थानच्या वतीने यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रा स्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला असून यात्रोत्सव काळात कोणताही अपघात होणार नाही तसेच भाविकांच्या दर्शनासाठी काय सोयी सुविधा करणार याबाबतचा आढावा त्यांनी घेतला आहे. उत्सव काळात यात्रेच्या दिवशी येथील यावल आगारासह भुसावळ पैसपूर येथूनही बसेस सुटतात

दरवर्षी यात्रेकरूंची वाढती गर्दी पाहता वर्षी देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे.  तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर  म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. लगतच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारसह पोर्णिमेला ही यात्रा भरते. माघ शुक्ल पक्षातील पहील्या तीथीलाच शनिवार आल्याने आजपासून यात्रा प्रारंभ होत आहे. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत

यात्रेचे  वार

१० फेब्रुवारी (शनिवार), १२ फेब्रुवारी (सोमवार), १७फेब्रुवारी (शनिवार) ,१९ फेब्रुवारी (सोमवार), २३ २४ फेब्रुवारी (पोर्णिमा) असे यात्रेचे वार आहेत यासह यात्रोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच सुटीचे व सोईनुसार मधल्या दिवसात ही येथे भाविकांची गर्दी असते.

*मान देण्याची प्रथा*

खानदेश वाशी यांचे श्रद्धास्थान असलेल्या या  मुंजोबाला इच्छित मागणे मागितल्यानंतर त्याची कार्यसिद्धी होताच त्या कुटुंबाकडून मुंजोबाला   यात्रेत मान देण्याची प्रथा आहे यात रोडगे, वरण ,भात व वांग्याच्या भाजीचे जेवण दिले जाते  यात्रेत असे मान देणाऱ्या कुटुंबीयांची संख्या शेकडोने असल्याने यात्रा स्थळी जिकडे-तीकडे जेवणावळीच्या पंक्ती दिसून येतात.

जादा बसेस

राज्य परिवहन महामंडळाकडून यावल,  भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात यात्रेच्या दिवशी येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.

व्यावसायिक दुकाने

यात्रेत पूजा, पत्री, खेळणी ,उपहारगृहे ,आकाश पाळणे, संसार उपयोगी वस्तू यासह विविध वस्तूंचे दुकाने लावलेले असतात.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे