जळगाव

रेडक्रॉस मार्फत यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील आपतग्रस्तांना मदत.

जळगाव – यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत गावातील शेतकरी अनिल धनराज सरोदे आणि  दगडु गेंदू पाटील यांच्या घरातील घरगुती, शेतीचे सर्व साहित्य आणि कागदपत्रे इत्यादी पूर्णतः जळून खाक झाले.

सदर माहिती माननीय जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांना प्राप्त होताच त्यांनी रेडक्रॉसला संपर्क साधत दोन्ही परिवारांना मदत करण्याबाबत सूचना केल्या. मा. जिल्हाधिकारी महोदयांच्या सूचनेनुसार तसेच उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी व आपत्ती व्यवस्थापन चेअरमन  सुभाष सांखला यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा व टीमने प्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन समक्ष पाहणी करीत दोन्ही परिवारांना भांड्याचा सेट, चटई, बादल्या, कपडे, स्वेटर, ताडपत्री, इत्यादी संसार उपयोगी साहित्य देऊन त्यांना मदत केली. याप्रसंगी यावल तालुक्याच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शासनामार्फत त्वरित नवीन रेशनकार्ड बनवून दिले आणि भविष्यातही मदत करण्याबाबत आश्वासन दिले.

रेडक्रॉसच्या या सेवा तत्परतेसाठी आपतग्रस्त परिवारांनी व ग्रामस्थांनी रेडक्रॉसचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे