गुन्हेगारीब्रेकिंगयावल

एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवकासह ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात..

यावल – तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर अर्थसाहयातून एक लाख रुपयाचे लाच घेताना ग्रामसेवकासह  ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर  एसीबीच्या जाळ्यात..

तक्रारदार यांचे चुंचाळे ता. यावल गावी वडीलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी मधुन गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करणाचे योजनेचा केंद्र शासन कडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. सदर मंजुरीचे रक्कमे तून ५० % प्रमाणे बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी , यांनी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी

लालेची मागणी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी केली असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पडताळणी करीत चुंचाळे ग्रामपंचायत येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने सापळा लावला. व पंचा समक्ष ग्रामसेवक यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. ग्रामसेवक जोशी यांनी सांगितल्याने ऑपरेटर यांनी एक लाख रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामसेवक व ऑपरेटर यांचेवर यावल  पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर कोळी यास अटक करण्यात आली असून ग्रामसेवक जोशी यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक शोध घेत आहे.

ही कारवाई सापळा पर्यवेक्षक अधिकारी ला.प्र.वि. पोलीस उप अधीक्षक, सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस नाईक सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील , बाळू मराठे , पो.ना. सुनिल वानखेडे, पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव , स.फौ.सुरेश पाटील, पो.हे. कॉ.रविंद्र घुगे, महिला पो.हे.कॉ. शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी, यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे