गुन्हेगारीधरणगाव

मुसळी फाट्या जवळ कपाशी व्यापाराच्या गाडीला धडक देत दीड कोटीची जबरी लूट…

जळगाव – धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्या जवळ कपाशी व्यापाराच्या गाडीला धडक देत मिरची पूड टाकुन दीड कोटीची जबरी लूट…

तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स या कापूस जिनिंगचे रक्कम घेऊन जात असताना गाडी निलॉन्स कंपनीसमोरील उड्डाणपुलाच्या जवळ येताच गाडीला समोरून जोरदार धडक दिली.स्कार्पिओ मधून आलेल्या चोरट्यांनी थेट क्रेटा कार वर हल्ला चढवला व डोळ्यात मिरची पुड फेकत १ कोटी ६० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन जळगावच्या दिशेने पळ काढला.

कारमध्ये धारदार शस्त्र व लाठीकाठी असल्याचे देखील कळते.विशेष म्हणजे घटनेनंतर चोरट्यांनी स्कार्पिओ घटनास्थळी सोडून चोरटे पसार झाले आहे सदर घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे