२० हजाराची लाच ग्रामपंचायत विभागाचे लिपिक एसीबी च्या जाळ्यात…
जळगाव- सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाच्या लिपीकांना २० हजाराची लाच घेतांना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले असुन महेश रमेशराव वानखेडे, लिपीक, ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व समाधान लोटन पवार , लिपीक, ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध मा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता. सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील महेश रमेशराव वानखेडे, यांचेकडे पेडींग होते. त्यानंतर तक्रारदार हे महेश रमेशराव वानखेडे यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता महेश वानखेडे लिपीक यांनी तक्रारदार यांना सांगितले कि तुमचा ३ अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो
त्यासाठी मला ३००००/- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.०९/३/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता लिपिक महेश वानखेडे यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी महेश वानखेडे लिपीक, यांनी सांगितल्याने लिपिक समाधान लोटन पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात २००००/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता. जि. जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे पोलीस निरीक्षक एन. जाधव, सफौ दिनेशसिंग पाटील , पो.ना. बाळू मराठे , पोकॉ अमोल सुर्यवंशी ,अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रणेश ठाकुर, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ प्रदिप पोळ.