भुसावळ मध्ये ७३ लाखांचे ड्रग्स जप्त : बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई..
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरात तब्बल ७३ लाखांचे ड्रग्स पकडण्यात पोलिसांना यश आले.भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील हॉटेल मधुबनच्या जवळ कुणाल भरत तिवारी, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. २४, तापी नगर, भुसावळ, जोसेफ जॉन वालाड्यारेस, वय २८ वर्षे, रा. रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ हे मानवी जिवीतास अपायकारक अंमली हा अमली पदार्थ विना परवाना बेकायदेशीररित्या विक्री करीता स्वताच्या कब्जात बाळगतांना मिळून आले. त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरात गुंगीकारक औषधीद्रव्ये मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याची गोपनीय माहिती काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल मधुबन येथे संशईत इसम नामे कुणाल भारत तिवारी, वय ३० वर्षे, रा. प्लोट नं. २४ तापी नगर, भुसावळ, जोसेफ जॉन वालाड्यारेस. वय २८ वर्षे, रा. रामायण नगर, कंटेनर यार्ड, वरणगांव रोड, भुसावळ हे अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बाळगुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या पथकाला मिळाली होती. म्होरक्याला जाळ्यात अडकविण्यासाठी आणि मोठा साठा जप्त करण्यासाठी पोलिसांनी सापळ्याचे नियोजन सापळा रचण्यात आला.मंगळवारी पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी त्यांचे पथक आणि सोबत दोन शासकीय पंच अशांनी बनावट ग्राहक पाठवून संशयीत आरोपी कुणाल तिवारी व जोसेफ जॉन वलाड्योमर यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. अंग झडतीमध्ये ९१० ग्रॅम Methaqualone सफेद रंगाचे दाणेदार पदार्थ मिळून आला असुन त्याची एकूण किंमत ७२ लाख ८० हजार एवढी आहे.
ड्रग्सची घटनास्थळावरच जळगांव फॉरेन्सिक युनीटच्या तज्ञांमार्फत प्राथमीक रासायनिक तपासणी केली असता तो पदार्थ हा Methaquilon नावाचा मानवी जिवीतास अपायकारक ठरणारा अंमली पदार्थ असल्याची खात्री करण्यात आली. गुन्ह्याचा अधिक तपास करताना सर्व ड्रग्स तिसरा आरोपी दिपेश मुकेश मालवीय, रा.शेर ए पंजाब हॉटेल वरणगाव रोड भुसावळ याने विक्री करीता पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील अटक केली. दिपेशची चौकशी केल्यावर कुलाबा, मुंबई येथील मृदुल चंपकलाल वैद्य याचे नाव समोर आले. पथकाने मुंबई येथून त्याला ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक मंगेश जाधव तसेच डीबी पथकातील अंमलदार हवालदार विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी योगेश महाजन, प्रशांत परदेशी, जावेद शाह, राहुल वानखेडे, भुषण चौधरी, अमर आढाळे यांनी ही कारवाई केली आहे.