
भुसावळ – वाळू वाहतुक सुरु ठेवण्यासाठी तलाठ्या सह कोतवाल व खाजगी पंटर 73 हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.नितीन पंडीतराव केले तलाठी,सज्जा वराडसीम ता.भुसावल. (महसुल विभाग वर्ग ३), जयराज रघुनाथ भालेराव,कोतवाल, कडोरा बुद्रूक, (महसलु विभाग वर्ग-०४), शिवदास लटकन कोळी, खाजगी पंटर, रा. तित्रे, ता. भुसावळ. असे त्यांचे नावे असून त्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांचे वाळु वाहतुकीचा व्यवसाय आहे. यातील तकारदार यांनी शिवदास लटकन कोळी, खाजगी पंटर याला फोन केला असता त्याने तकारदार यांना भुसावळ येथुन डंपरद्वारे वाळु वाहतुक करु देण्यासाठी केले आप्पा व कोतवाल जयराज भालेराव यांचे नाव सांगुन दरमहा ७३,००० रुपये लाचेची मागणी करत असले बाबत ला.प्र.वि. जळगांव यांचेकडे दि.१५.०९.२०२५ रोजी तकार दिली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने दि.१५.०९.२०२५ रोजी खाजगी पंटर शिवादास कोळी याची प्रत्यक्ष पडताळणी केली असता त्याने तकारदार यांचा वाळूचा डंपर चालू देण्यासाठी तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचे साठी प्रत्येक महिन्याला ७३,००० रुपये हफ्ता द्यावा लागेल असे सांगितले. सदर वेळी नितीन पंडीतराव केले तलाठी व जयराज रघुनाथ भालेराव,कोतवाल,यांची शिवदास लटकन कोळी, खाजगी पंटर यांचे मोबाईल फोन वरुन पडताळणी केली असता त्यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले. त्यानंतर आज दि.१३.१०.२०२५ रोजी शिवदास लटकन कोळी, खाजगी पंटर याने तकारदार यांचे कडून ७३,०००/- रु लाच रक्कम स्वतः स्विकारली असता त्यांना एसीबी च्या पथकाने रंगेहात पकडण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान यातील नितीन पंडीतराव केले तलाठी, यांच्या ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता त्यात १,६५,०००/- रुपये रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचे ०२ मोबाईल, जयराज रघुनाथ भालेराव,कोतवाल, यांच्या अंगझडतीत वन प्लस कंपनीचा मोबाईल व शिवदास लटकन कोळी, खाजगी पंटर याचे अंगझडतीत लाचेची रक्कम ७३,०००/- रु.रोख या व्यतिरीक्त ८६,०००/- रुपये इतर रोख रक्कम मिळून आली.
सदर कारवाई
जळगाव एसीबी चे पोलीस उप अधीक्षक, योगेश ठाकूर, स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक हेमंत नागरे,श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील पोना/बाळु मराठे,पोकों/ राकेश दुसाने,पोकों/प्रणेश ठाकूर पोकों/भूषण पाटील.यांनी केली.