राजकीय

रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ फेरो ऑईलटेक प्रा.लि., एम.आय.डी.सी., मलकापूर येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन..

मलकापूर – रावेर लोकसभा क्षेत्रसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्रपक्षाच्या संयुक्त “महायुती” च्या अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ फेरो ऑईलटेक प्रा.लि., एम.आय.डी.सी., मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले. तसेच यावेळी फेरो ऑईलटेक प्रा.लि., येथील नवीन टेक्नोलॉजी युक्त डी-लिंटर मशीनचे श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह माजी आमदार श्री.चैनसुख संचेती, श्री.शिवचंद्र तायडे, रामनिवास चंदुलाल बोहरा.मोहनजी शर्मा, .डी.एस.चव्हाण सर, तालुकाध्यक्ष .ज्ञानदेव वाघोदे ई. प्रमुख उपस्थितीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे