रावेर लोकसभा रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची “महाविजय संकल्प सभा”
“सार्वत्रिक निवडणुक 2024” मध्ये “रावेर_लोकसभा” क्षेत्र उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथील मातृभुमी चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत “महाविजय संकल्प सभा” चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, आमदार. संजयजी सावकारे यांच्यासह महायुती पदाधिकारी यांनी यांनी मोदी सरकार च्या विकास कामांची माहिती देऊन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी महायुतीच्या भाजपा उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री श्री.गिरीषजी महाजन, आमदार संजय सावकारे, माजी आमदार चैनसुखजी संचेती, आमदार.रमेशदादा पाटील, आमदार .आकाश फुंडकर, आमदार चंद्रकात पाटील, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, माजी खासदार उल्हासदादा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, लोकसभा निवडनुक प्रमुख नंदकिशोर महाजन, रा.कॉं.पार्टी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष राजूजी सुर्यवंशी, शिवसेना जिल्हाध्यक्ष समाधानजी महाजन सर, बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, लहुजी शक्तीचे जिल्हाध्यक्ष विलास दादा, डॉ.राजेंद्र फडके, शिवचंद्र तायडे, अशोक कांडेलकर, डॉ.केतकी पाटील, संजय गरूड रमेश मकासरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष .रंजना पाटील व महायुती व मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.