जळगाव

जळगाव लोकसभा मतदार संघात 58.47% तर रावेर लोकसभा मतदार संघात 64.28%  मतदान

जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात सोमवार दि. १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण ५८.४७% तर रावेर लोकसभा मतदार संघात ६४.२८% मतदान झाले.

सोमवार दि. १३ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदार संघात सुरुवात झाली. सांयकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सकाळी ऊन होण्याच्या आधी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या . जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अल्पबचत भवन येथे मतदान केंद्रावरची हालचाल टिपण्यासाठी वेबकास्टिंग कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्वतः जिल्हाधिकारी दिवसभर या वर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर लक्ष ठेऊन असल्यामुळे मतदान शांततेत पार पडले.

सकाळी ११ ते १ या कालावधीत सर्वाधिक मतदान

जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सर्वाधिक मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळच्या वेळेत गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी उन्हाची वेळ झाल्यानंतर मात्र गर्दी ओसरली.

मतदानाची टक्केवारी

जळगाव लोकसभा मतदार संघात ६ लक्ष २८ हजार १२३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ५ लक्ष ३७ हजार ८२७ महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तर १८ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६०.५५% पुरुष, ५६.२२% महिला व २१.१८% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ५८.४७% मतदान झाले.

रावेर लोकसभा मतदार संघात ०६ लक्ष २१ हजार ९८३ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर ०५ लक्ष ४८ हजार ९५० महिला मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजाविला, तर ११ तृतीयपंथी यांनी मतदानाचा हक्क वाजविला. एकूण ६६.०५% पुरुष, ६२.३८% महिला व २०.३७% तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असे एकुण ६४.२८% मतदान झाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे