जळगाव पुन्हा हादरले : एकाची गळा चिरून निर्घृण हत्या
जळगाव :जिल्हयात एका मागून एक खून होत असताना जळगाव शहारातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री कामावरून घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्यादरम्यान सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत एम आय डी सी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतले .
पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय आसाराम मनोरे, पीएसआय रविंद्र चौधरी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सचिन मुंडे, राजेंद्र कांडेकर, रतीलाल पवार, सिध्देश्वर डापकर यांनी संशयित आरोपींना अटक केली., सिध्देश्वर डापकर यांनी संशयित आरोपींना अटक केली.