आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे शासकीय रुग्णालय जळगाव येथे फळं वाटप..

जळगाव – दि.17 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महानगर जळगांव तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने शासकीय रुग्णालय जळगाव येथील गोर गरीब रुग्ण व त्यांचा नातेवाईकांना केळी , सफरचंद , डाळीब , चिकू फळं वाटप करण्यात आले
ह्या वेळेस सदरचे वर्ष हे शेतकरी वर्ग व सामान्य नागरिकांसाठी भरभराटीचे जावो असे साकडे विठ्ठला कडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा तर्फे घालण्यात आले
या वेळेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी , सरचिटणीस सुनीलभैय्या माळी , राष्ट्रवादी युवक महानगर अध्यक्ष रिकू चौधरी , महानगर जिल्हाउपअघ्यक्ष किरण राजपूत , राष्ट्रवादी अल्पसंख्यक महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिझवान खाटीक , राष्ट्रवादी युवक महानगर सरचिटणीस हितेश जावळे , महानगर जिल्हासरचिटणीस रहिमभाई तडवी , महानगर जिल्हासरचिटणीस सुहास चौधरी , नितीनभाऊ मोरे , महानगर चिटणीस नईम खाटीक , कार्यालय मंत्री राहुल टोके आदी उपस्थित होते