गुन्हेगारीजळगाव

शनिपेठ पोलीस ठाण्यात पोलीसां समोरच दोन गटात हाणामारी..

जळगाव : जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान हाणामारी झाली.तक्रार देण्यासाठी आलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकासह त्यांच्या समर्थकांना पोलिसांसमोरच दुसऱ्या गटाने बेदम मारहाण केली. या राड्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी झाली . माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा यांच्या गटात महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ठेक्यांच्या वादातून हि मारहाण झाल्याचे समजते.

पोलीस ठाण्याच्या आतच दोन्ही गट एकमेकांना भिडल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात ‘फ्री-स्टाईल’ हाणामारी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी कारवाई करत परिस्तिथी नियंत्रणात आणली.

या भीषण वाद राजकीय आणि टेंडर चे कारणा मुळे झाला असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहिती वरून समजते.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.

 भर पोलीस ठाण्यात झालेला हा हल्ला जळगावच्या गुन्हेगारीचे वाढते चित्र दर्शवणारा असून, पोलीस आता या वर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे