ब्रेकिंग

पाळधीत भीषण दुर्घटना : स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी..

जळगाव – पाळधी परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या बांधकाम कामादरम्यान मोठा अपघात घडला. सुरू असलेल्या कामाचा स्लॅब अचानक कोसळल्याने कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एकूण ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा कायापालट करण्यासाठी पर्यटन विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाचे काम सुरू असताना अचानक स्लॅबचा काही भाग कोसळला. स्लॅब खाली कोसळताच त्या ठिकाणी काम करणारे कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. परिसरातील नागरिक आणि इतर कामगारांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले.अपघातानंतर जखमी कामगारांना तातडीने  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम सुरू असताना सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का? निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? याबाबत प्रशासनाकडून चौकशीची मागणी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे