जळगाव

लक्झरी बस व डंपरच्या अपघातात 20 जण जखमी…

जळगांव – पाचोरा तालुक्यातील वावडदे रोडवर लक्झरी व डंपरच्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहे यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. नांदगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून ज्या वळणावर अपघात झालेला आहे त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावले नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. यापूर्वी याच ठिकाणी अपघात झालेला आहे. त्यात बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झालेला होता मात्र आजपर्यंत या ठिकाणी सूचनाफलक लावले गेले नाही.

पाचोरा जळगाव रोड वरील हॉटेल प्रधान जवळच सुरेश विक्रम पाटील यांच्या शेता जवळ नागमोडी वळण आहे. वावडदे कडुन जाणारे डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व पाचोरा कडुन येणारी लक्झरी बस क्रमांक एम एच 19 वाय 3359 मध्ये भीषण अपघात घडल्याची घटना दि.1 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास घडली

पाचोरा – जळगाव प्रवासी ने आण करणारी लक्झरी बस ही पाचोरा येथून प्रवासी भरून जाररगाव चौफुली वरून निघून जळगावच्या दिशेने जात असताना वावडदे गावाजवळील वळणावर जळगाव कडून पाचोरा च्या दिशेने येणाऱ्या डंपर क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77 व लक्झरी बस क्रमांक एम एच 19 वाय 3359  या बसची जोरदार आमने-सामने धडक झाली, हा अपघात इतका मोठा होता की यात दूरपर्यंत आवाज जाऊन लक्झरी बस एका बाजूने चिरफाडली गेली, यात लक्झरी बस चालक वाहक व प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत, लक्झरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,

घटना घडली त्यावेळी वावडदा गावातील गावकऱ्यांनी धाव घेत गंभीर जखमींना तात्काळ जळगाव कडील रुग्णालयाकडे रवाना केले आहे. या घटनेत सुमारे 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, सदर लक्झरी बस त्यावरील चालक व मालक हे वडली गावातील असल्याची माहिती समोर येत आहे. तर या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वावडदे येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कापडणे. संतोष नेटके.सुमित पाटील.रविंद्र येवले. शुभम सोनवणे दापोरा. संजय पाटील. विलास गोपाळ. हावे मृत्युंजय दूत सदस्य सुमित पाटील. प्रमोद पाटील.आंबा गोपाळ सह वावडदे येथील नागरीक मदतीसाठी उपस्थित होते

हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग जाहीर झालेल्या मात्र या वर्णावर आजपर्यंत कोणतेही बोर्ड किंवा सूचनाफलक गाडी चालकांना लावण्यात आलेले नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे