जळगांव जिल्ह्यातील आप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश….
जळगाव – महाराष्ट्र प्रदेश काँगेस कमिटीच्या उपाध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे व जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा शाम तायडे यांच्या उपस्थितीत जळगांव शहरातील आप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जळगांव येथे काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्ष नेता व काँग्रेस चे नेते आदरणीय राहुल गांधी जी व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदरणीय ना. बाळासाहेब थोरात व जळगाव जिल्ह्याच्या प्रभारी मा प्रतिभाताई शिंदे व जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, शाम तायडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आप पक्षाच्या
अमृता नेतकर (मा. जिल्हा अध्यक्ष महानगर अध्यक्ष आप.) रईस कुरेशी (जिल्हाध्यक्ष भारतीय नागरिक आघाडी .) लूकमान लोखंडवाला (पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष.) इरफान शेख (सोशल मीडिया प्रमुख.) नाझिम कुरेशी (युवा आघाडी शहराध्यक्ष.)तोसिफ खान (शिक्षक आघाडी. )असलम पठाण (कामगारा आघाडी.)आरिफ खान (जिल्हा सदस्य.)सुरज तडवी, राजेंद्र जंजाळ, अमित राठोड , मोहम्मद कैफ, हसन शेख ,सलीम मणियार, अमित मणियार ,रफिक शहा, विलास राठोड , भूषण नगरे, तावडे सर, सय्यद तारीफ ,वसीम तडवी ,अनिल वाघ सर.
आदी विविध कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जळगाव काँग्रेस पक्ष प्रवेश केला.
यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात युती सरकारच्या कारभाराला व गलिच्छ राजकारणाला कंटाळलेले अनेक इतर पक्षातले कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात येतील व राज्यात तसेच जलगांव जिल्ह्यात काँग्रेस व महाविकास आघडीचीच सत्ता येईल असेही त्यांनी मत व्यक्त केले.