राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नाईक महाविद्यालय रावेर येथे विविध स्पर्धांचे आयोजन..
(रावेर प्रतिनिधी – सानिया तडवी)
रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही.एस.नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर येथे 29 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले व व खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.डी.धापसे उपस्थित होते. क्रीडा समिती सदस्य प्रा.सी.पी.गाढे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जिवंत असणे काळाची गरज आहे असे सांगितले. क्रीडा संचालक डॉ.उमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.नीता जाधव, डॉ. स्वाती राज कुंडल उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा समन्वयक डॉ.उमेश पाटील व क्रीडा समिती सदस्य प्रा. सी.पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा,तायकांडो,रग्बी अशा खेळांचा समावेश होता.
संबंधित खेळामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कॅरम स्पर्धा महिला संघ प्रथम क्रमांक कु.निशा पटेल व प्रीती ठाकणे, द्वितीय क्रमांक नंदिनी बारी व राधिका पाटील.पुरुष संघ प्रथम कु.विशाल तायडे व वंश घोरपडे,द्वितीय भिमराव हिवरे आणि हर्षल पाटील.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.शिपाई सुनील मेढे यांनी सहकार्य केले.