भगिनींनी भरविला “विजयाचा पेढा”, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराने घेतला वेग..
गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षकवाडी भागात घेतल्या भेटी..
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारात दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसून येत आहे. बुधवारी दुपारी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षकवाडी, गंधर्व कॉलनी आदी भागात आ. भोळे यांच्या प्रचाराने वेग घेऊन जनतेचा आशीर्वाद मिळविला.
सुरुवातीला श्री हरी नगरात हनुमान मंदिरात पूजा अर्चा करून विजयी होण्यासाठी बजरंगबलीचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर गुरुदत्त कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, विजय कॉलनी, जीवन विकास कॉलनी, चंद्रप्रभा कॉलनी, गजानन कॉलनी, मित्र नगर, चैतन्य नगर, गंधर्व कॉलनी, नवप्रभात कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, शिक्षकवाडी, हरेश्वर नगर, अजय कॉलनी, यशवंत कॉलनी, डेमला कॉलनी मार्गे दुसऱ्या टप्प्यातील प्रचार रॅली काढण्यात आली. आ. राजूमामांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी आ. राजूमामांना चक्क हात धरून “आमच्या घरी या” म्हणत घरात नेऊन औक्षण करीत त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
दिलीप झापक यांच्या घरी महिला भगिनींनी आ. भोळे यांचे औक्षण करून पेढा भरवित, ‘मामा, हा विजयी झाल्याचा पेढा समजा’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. तसेच, परिसरातील विविध मंदिरात जाऊन देवीदेवतांचे आ. राजूमामा यांनी आशीर्वाद घेऊन विजयासाठी साकडे घातले. रॅलीमध्ये लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, मंडळ क्रमांक ४ चे अध्यक्ष मनोज काळे, माजी नगरसेवक दीपमाला काळे, अमित काळे, केदार देशपांडे, धीरज वर्मा, सुभाष ठाकरे, ऋषी शिंपी, चेतन डेमला, आसाराम महाले, ॲड. सतीश महाजन, सरोजिनी पाठक, दीप्ती चिरमाडे, सविता बोरसे, शैला पवार, जिज्ञासा पवार, सरला पवार, अर्चना पाटील, अंजली धवसे, सविता पोळ, नयना चौधरी, माधुरी अत्तरदे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, ॲड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, शंतनू नारखेडे, अजित राणे, रेखा पाटील, जितेंद्र मराठे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे पदाधिकारी विनोद देशमुख, रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लल्लन सपकाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.