जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आगामी विजयाचा मिळाला विश्वास : आ. भोळे
खेडी, ज्ञानदेव नगर, विठोबा नगर भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघमधील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात खेडी, ज्ञानदेव नगर, तळेले कॉलनी, दशरथ नगर भागात आ. भोळे यांना आबालवृद्धांपासून महिला भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
खेडी येथील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर आ. भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. शिवनगर, डॉ. आंबेडकर नगर, इंदिरा नगर परिसर, विठोबा नगर, ज्ञानदेव नगर, सुंदर नगर, महादेव नगर, दत्त नगर, प्रेमचंद नगर, योगेश्वर नगर, तळेले कॉलनी मार्गे दशरथ नगर येथे रॅलीचा समारोप झाला. मार्गात नागरिकांनी रांगोळ्या काढून, फुलांचा वर्षाव करून आ. राजूमामा भोळे यांचे औंक्षण केले.
प्रचार रॅलीतून मायबाप जनतेने भरभरून आशीर्वाद देत दाखवलेला उत्साह हा अभूतपूर्व असून या प्रचार रॅलीने खेडी, ज्ञानदेव नगर परिसरात वातावरण महायुतीसाठी अनुकूल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध दिसून आले आहे. जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आपल्याला आगामी विजयाचा विश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. प्रसंगी रॅलीमार्गातील विविध मंदिरात जाऊन देवी-देवतांचे दर्शन घेत आ. भोळे यांनी आशीर्वाद घेतले.
रॅलीमध्ये मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी नगरसेवक प्रवीण कोल्हे, रंजना सपकाळे, डॉ. वीरेन खडके, भरत कोळी, धुडकु सपकाळे, विजय वानखेडे, निलेश तायडे, प्रदीप रोटे, किसन मराठे, बंटी भारंबे, गणेश सपकाळे, विनोद चौधरी, धनराज पाटील, संदीप बऱ्हाटे, नाना देशमुख, उज्ज्वल चौधरी, सुषमा चौधरी, निशा पवार, भारती म्हस्के, पुष्पा तळेले, पिंटू बेडिस्कर,शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, पियुष कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अर्चना कदम, रिपाई (आठवले) गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, नाना भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.