स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा..

जळगाव – ०३ ऑक्टोबर येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी अभिजात मराठी भाषा या विषयावर व्याख्यान दिले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळाला, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रकिया कशी असते. या प्रक्रियेत काम करणाऱ्या समितीने केलेले कार्य. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय ? इत्यादी मुद्द्यांवर त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. यासोबत प्राचीन मराठी साहित्यातील काही उदाहरणे व दाखले मराठी भाषेचे अभिजातपण पटवून दिले. तसेच मराठी भाषेतील भविष्यातील व्यावसायिक संधींविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे तसेच पर्यवेक्षक प्रा.स्वाती बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सूत्रसंचालन प्रा.ईशा वडोदकर यांनी तर आभार प्रा.संध्या महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.अर्जुन मेटे, प्रा. दिपक चौधरी,प्रा.उमेश ठाकरे, डॉ.अतुल इंगळे, डॉ.जयंत इंगळे, प्रा.छाया चौधरी, प्रा.छाया पाटील, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा. रुपम निळे , प्रा.विजय भोई , प्रा.ज्योती मोरे, प्रा.संदीप गव्हाळे, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.गुणवंत वंजारी, प्रा.पूजा सायखेडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.