बोदवड

कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी..

रोहिणी खडसे यांची बोदवड तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

बोदवड– बोदवड तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे या नुकसानीची पाहणी करून कापुस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि बोदवड तालुक्यात गेल्या महिन्या भरापासून परतीचा संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबिनला कोंब फुटून हि पिके जमीनदोस्त झाली आहेत

त्यातच सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असुन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे

शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने कपाशी वर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची पाने लाल पिवळी होऊन पानगळ झाली आहे त्यामुळे कपाशीची जेमतेम एक वेचणी होऊन अजून कापुस उमलण्याची आशा मावळली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापुस लागवडी साठी बियाणे , कीटकनाशके फवारणी, रासायनिक खतांसाठी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे यामुळे कापुस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे.मागिल काळात यावेळेप्रमाणे कापुस पिकाचे लाल्या रोगाने नुकसान झाले होते त्यावेळी माजी मंत्री आ एकनाथ राव खडसे यांच्या माध्यमातून कापुस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाचे अनुदान मिळाले होते तरी यावेळी सुद्धा लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शेतकरी बांधवांना सरसकट लाल्या रोगाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

यावेळी तालुका अध्यक्ष आबा पाटिल,माजी सभापती गणेश पाटिल,भरत अप्पा पाटिल, दिपक वाणी, किरण वंजारी,विजय चौधरी,वामन ताठे,अक्षय चौधरी,प्रदिप बडगुजर, सतिष पाटिल,निलेश पाटिल कविता गायकवाड ,वंदना पाटिल,हकीम बागवान,विशाल पाटिल, शुभम माळी,नईम खान, मयुर खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकरी बांधवांचा या खरिप हंगामात बि बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे