यावल वनविभागाची यावल वनपरीक्षेत्रात अवैध दारूभट्यांवर धडक कारवाई..
यावल – दि. १५ रोजी सकाळी वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक, कक्ष क्र. ३५ मध्ये महसुली हद्दीपासून ५०० ते १००० मीटर अंतरावर चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत २ अवैध गावठी दारू भट्ट्यांसह ८ बॅरल गावठी दारूचे रसायन (१६०० लिटर) किंमत ५६०० व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट केले असून ४ लोखंडी बॅरल व अन्य लोखंडी साहित्य अंदाजे किंमत रु २००० जप्त करण्यात आले,
सदर कारवाईत वनरक्षक बोरखेडा बुद्रुक यांचेकडील प्रं.रि. क्र.०८/२०२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरील कारवाई ही यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील , वन परिक्षेत्र अधिकारी,यावल पूर्व स्वप्नील फटांगरे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली.कारवाई दरम्यान वनपाल गस्ती पथक आर. एम. जाधव, आर. बी. थोरात तसेच वनरक्षक प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, सुपडू सपकाळे, राजू बोंडल, बालाजी जोहरी, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम तसेच वाहन चालक आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते.