विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाची धडक कारवाई..
राज्य उत्पादन शुल्क विभाग भुसावळ पथकाची अवैध हातभट्टी दारु निर्मीती केंद्रे व अवैध मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यांवर धडक कारवाईमुळे अवैध मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
भुसावळ – आदर्श आचार सहिता विधानसभा सार्वजनिक निवडणुका २०२४ च्या अनुशंगाने राज्य उत्पादन शुल्क भुसावळ यांनी जिल्हयात उल्लेखनिय कामगिरी केलेली असून आदर्श आचारसंहितेच्या एक महिन्याच्या कालावधीत विभागाने एकूण ६५ गुन्हे नोंद ६१आरोपी अटक ५ वाहने जप्त एकूण मुद्रदे माल २३लाख ९३हजार ३१० रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई भुसावळ विधानसभा मतदारसंघ क्र-१२ मुक्ताईनगर वि.स.क्र-२० तसेच रावेर वि.स.क्र-११ या मतदार संघात व याच्या अंतर्गत असलेले बाजारपेठ पो. स्टेशन शहर पो. स्टेशन भुसावळ तालुका बोदवळ, मुक्ताईनगर, वरणगांव, सावदा, निंभोरा, रावेर हया पो. स्टेशन क्षेत्रात करण्यात आल्या. तसेच एक पथक रात्रीच्या गस्ती करिता विशेष पथक कार्यरत आहे. व तापी पुर्णा क्षेत्रात बेटावर असलेले हातभटूटी केंद्रावर पथकाने होडीने जाउन उधवस्थ केलेली आहे
परराज्यातील मध्यप्रदेश हया मतदार संघाना लागून असल्यामुळे सिमेवर ३ ठिकाणी सिमा तपासणी नाके उभे करण्यात आलेले असुन अहोरात्र वाहनांची तपासणी सुरु आहे. व दिवसाला सरासरी ५०० वाहन तपासली जातात. सिमा तपासणी नाक्याची उभारणी चोरवड (रावेर), पुर्णाळ (मुक्ताईनगर), पाल (रावेर), येथे करण्यात आलेली आहे. तसेच मध्यप्रदेश अबकारी विभागाशी संपर्क साधून सिमालगत क्षेत्रात संयुकतिक कारवाया चालु आहे.
वरील कारवाई डॉ.व्हि.टी. भुकन अधिक्षक, जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दु नि आर.डी. सोनवणे, स.दु.नि आय.बी. बाविस्कर, जवान अजय गावंडे, सरिता चव्हान, नंदु नन्नवरे, सत्यम माळी व स्वप्नील पवार यांनी केलेला असुन हया करवाया निवडणुका होईपर्यत व त्यानंतर देखील अशाच चालू राहतील याची ग्वाही विभागीय निरीक्षक कपाटे यांनी दिली.