यावल येथे विना परवाना ताडी विक्री केंद्रांवर धाड : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई..

यावल ( सुरेश पाटील ) – शहरात बोरावल गेट परिसरात मेन रोडवर म्हसोबा देवस्थान पासून १०० ते १५० मीटर अंतरावर विनापरवाना ताडी विक्री व पन्नीची दारू विक्री करणाऱ्या दुकानात तथा दुकानाच्या दर्शनी भागावर दुकानाच्या नावाचा फलक नसलेल्या दुकानात गुरुवार दि.२९ रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने अचानक छापा टाकून विनापरवाना ताडी विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली.

याबाबत अधिकृतरित्या मिळालेली सविस्तर माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकाने दि. २९/०५/२०२५ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार बोरावल गेट यावल, तालुका यावल, जि.जळगाव येथे विना परवाना ताडी विक्री केंद्रावर छापा टाकला असता २५० ली.ताडी साठा ( किंमत ८८७०/ ) मिळून आला महाराष्ट्र दारुबंदी गुन्हया अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्हयाचे तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक नवनाथ घोडके हे करीत असून सदर कारवाई सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटील,जवान सर्वश्री सोमनाथ पाटील शाहरुख तडवी यांनी केली. या कारवाईमुळे यावल शहरात समाधानकारक कौतुकास्पद बोलले जात आहे.