बालदिन उत्साहात : रुग्णालयात मुलांना खाऊ वाटप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपक्रम..
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग विभागातर्फे गुरुवारी दि. १४ रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विभागात दाखल मुलांना खाऊ वाटप करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग व चिकित्साशास्त्र विभाग दरवर्षी बाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबवते. यंदा कक्ष क्र. ४ आणि लहान मुलांचा अतिदक्षता विभाग येथे मुलांशी डॉक्टरने संवाद साधून त्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळेला त्यांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांनी मुलांसोबत गप्पा करून त्यांना तणावमुक्त केले.
प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. विलास मालकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील, उरोरोग विभागाचे डॉ. विश्वनाथ पुजारी, विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, सहायक प्रा. डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा चांडक, डॉ. कौस्तुभ चौधरी, डॉ. अनिरुद्ध कारंडे, डॉ. सुरसिंग पावरा, डॉ. स्नेहल दांगट, डॉ. रितेश पांडे यांच्यासह इन्चार्ज परिचारिका संगीता शिंदे यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, वर्ग ३ व वर्ग ४ चे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.