जळगाव
जळगावच्या विकासाचा रथ अविरत…
जळगाव – शनिवार,रोजी ज्येष्ठ उद्योजक व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे चेअरमन अशोकभाऊ जैन व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश दामु भोळे ऊर्फ राजूमामा यांची जळगावच्या विकासासंदर्भात व ‘व्हिजन डॉक्युमेंट 2024-2029’ यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी राजूमामांनी येत्या पाच वर्षात करावयाची कामे यासंदर्भात.अशोकभाऊ जैन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. जैन हिल्स येथे झालेल्या या भेटीत सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, दळण-वळण, पर्यावरण, शैक्षणिक, क्रीडा, ऊर्जा आदि विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. या दुग्धशर्करा भेटीमुळे जळगावला वैभवप्राप्त करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.