जळगाव

जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनचा आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

पत्र देऊन व्यक्त केल्या शुभेच्छा 

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव जिल्हा मूकबधिर असोसिएशनने महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना एका पत्राद्वारे जाहीर पाठिंबा देऊन त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

एका पत्राद्वारे त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. यापूर्वी आपण केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेऊन मतदार संघातील नागरिकांचे विविध प्रश्न आपण मार्गी लावले आहेत. तर भविष्यात शहरातील मूकबधिर, कर्णबधिर दिव्यांगांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आपण सोडवू शकाल अशी आम्हाला खात्री आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ आम्हाला मिळेल म्हणून आम्हाला आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष व कृतीशील आमदाराची आवश्यकता आहे असा आशय पत्रामधून व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे