अवैध गॅस भरणा स्फोट प्रकरणी MIDC पोलीस निरिक्षकांची नियंत्रण कक्षात बदली..
जळगाव – शहरातील इच्छादेवी चौकाजवळ झालेल्या अवैध गॅस भरणा सेंटर वरील ओमानीच्या स्फोटामुळे सात जणांचा बळी गेला होता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे.
शहरातील इच्छा देवी चौक या ठिकाणी एका गाडीमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करण्यात येत होते हे गॅस रिफिलिंग होत असताना स्फोट झाला व या स्फोटामध्ये आजपर्यंत ७ जणांचा बळी गेलेला आहे.घटनेनंतर तत्काळ २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. मात्र पोलीस निरीक्षक यांची बदली काही काळ लांबलेली होती मात्र शनिवारी
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची शनिवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
आता या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याची बदली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. आता कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे राहील
मात्र नवीन अधिकारी आल्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरामध्ये असलेले अवैध धंदे बंद करण्यात ते यशस्वी होतील का? या ठिकाणी अवैध व्यवसाय,जुगार अड्डे, सट्टा अवैध गॅस रिफिलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात सुरू होते, आतातरी MIDC परिसरातील अवैध धंदयावर आळा बसणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.