पिस्टलच्या साह्याने दहशत माजवीणाऱ्या एकास पिस्टलसह MIDC पोलिसांनी घेतले ताब्यात..

जळगांव – दि. २३ रोजी पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांना माहीती प्राप्त झाली होती.एक इसम शुभम अनंता राउत वय 21 रा. भगवा चौक सुप्रिम कॉलनी हा स्वताजवळ अग्निशस्त्र बाळगुन परीसरात दहशत पसरवीत आहे. मिळालेली माहीती उपविभागीय अधीकारी संदीप गावीत यांना कळवीले असता वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन रवाना केले असता सुप्रिम कॉलनी तलाव परीसरात सदर ईसम शुभम राउत मिळुन आला. त्याची अंगझडती घेता त्याचे कडे गावठी कट्टया सारखे दिसनारी एअर गन मिळुन आली. सदर ईसमाची चौकशी करता त्याने माहीती दिली की, त्याचा मित्र नामे बंटी तायडे रा. तायडे गल्ली जळगांव याच्या कडे एक पिस्टल दिलेली आहे. बंटी तायडे चा लागलीच शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही.
तरी त्याचे घराची घरझडती घेता त्याचे घरात एक गावठी बनावटीची पिस्टल मिळुन आली आहे. सदरची पिस्टल जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात शुभम राउत यास अटक करण्यात आली असुन त्याचे साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी. चद्रकांत धनके सोबत पो. काँ योगेश घुगे हे करीत आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा..
MIDC पोलीसांची कारवाई परजिल्हयातील आरोपीकडून चोरीच्या ५ मोटारसायकल हस्तगत..