जळगाव

जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

जळगांव– येथील पत्रकार विक्रम कापडणे यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करणे याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेर कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे तेथे आले आणि त्यांनी त्यांचा कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेतला एका कर्मचाऱ्याजवळ दिला आणि त्यातील मेमरी कार्ड काढून घेतले. त्यानंतर महानगरपालिकेतून निघून जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी विक्रम कापडणे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात तक्रार क्रमांक: ७२३/२०२४.कायदेशीर कलम: कलम ११५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विक्रम कापडणे यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात, विशेषतः सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शूटिंग करणे कायदेशीर आहे. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांना याबाबत माहिती दिल्यानंतरही त्यांनी अरेरावी केली व अधिकाराचा गैरवापर करत कॅमेरा काढून घेतला.यावेळी घटना घडताना साक्षीदार म्हणून  मनपातील काही कर्मचारी तेथे उपस्थित होते.

कायदेशीर दृष्टिकोन: उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता टिकवण्यासाठी व जनहिताच्या मुद्द्यांसाठी शूटिंग करण्यास मनाई नाही. अशा परिस्थितीत, शासकीय अधिकारी जर त्यांच्या पदाचा गैरवापर करत पत्रकारांना काम करण्यापासून रोखत असतील तर तो कायद्याचा भंग मानला जातो.

या प्रकरणावर पोलीस तपास सुरू असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची भूमिका व त्यांचा प्रतिवाद काय आहे, यावर तपशील येणे अपेक्षित आहे. तसेच, पत्रकार संघटनांकडूनही या घटनेचा निषेध केला आहे.सार्वजनिक क्षेत्रातील पारदर्शकतेसाठी पत्रकारितेचे महत्त्व असून, अशा घटना पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काही पत्रकारांनी केला आहे.

सदरील घटना ही सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात शूटिंग करण्यास मनाई आहे असं काही आपल्याकडे जजमेंट आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर संबंधित अधिकारी हे निरुत्तरित झाले.त्यानंतर सर्वांच्या साक्षीने गणेश चाटे यांनी संबंधित पत्रकारांचा कॅमेरा हा परत केला या सर्व घटनेत पत्रकारांचा कॅमेरा याचे काही नुकसान झाले आहे का किंवा त्याच्यातील काही महत्त्वाचे व्हिडिओ आहे डिलीट झाले आहेत का हे सविस्तर कॅमेरा ऑपरेट केल्यानंतरच कळेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे