जळगाव

महानगरपालिकेच्या अपघातात मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना 43 लाख नुकसान भरपाई रक्कम देण्याचे आदेश..

जळगांव – येथिल जिल्हा व सत्र न्यायालय येथे आयोजीत राष्ट्रीय लोकअदालमध्ये एका मोटर अपघात दाव्यामध्ये चर्चेअंती अर्जदारांना नुकसान भरपाई पोटी 43 लाख रूपये देण्याचे आदेश एच.डी.एफ.सी. जनरल इंश्युरंन्स विमा कंपनी यांना देण्यात आले. घटना अशी की,

जळगांव शहर महानगर पालिका येथे सफाई कर्मचारी म्हणुन नोकरीला असणारे रेहानाबी तस्लीम शेख वय 42 वर्ष रा. शिवाजी नगर जळगांव. यांचा दि. 26/04/2020 रोजी अजिंठा चौफुली कडुन कालींकामाता मंदीराकडे त्यांची हिरो प्लेझर स्कुटी कं. MH-19-BT-9974 या गाडीने जात असतांना अपघात झाला होता. त्याना पाठीमागुन येणारी ट्रक कं, MH-15-BG-7856 या ट्रकने जोरात ठोस मारली. सदर अपघातामध्ये गाडी चालवत असलेली रेहाना तस्लीम शेख व तिच्या कुशीत असलेला 4 वर्षाचा नातु हा ट्रकच्या मागील चाकामध्ये येवुन आजी व नातु यांचा घटनासथळावरच मृत्यु झाला.

सदर अपघाती मृत्युनंतर मयत यांचे वारसांनी मागुन ठोस मारणाऱ्या ट्रक चालक व मालक, विमा कंपनी विरूध्द नुकसान भरपाई मिळणे कामी जळगांव येथील मे. मोटार अपघात दावा प्राधिकरण यांच्या समक्ष अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांचे मार्फत नुकसान भरपाई दावा दाखल करण्यात आला.सदरचा सामनेवाला ट्रक हा विमाकृत असल्याने सामनेवाला ट्रकचा चालक, मालक व त्यांची एच.डी.एफ.सी. जनरल इंश्युरंन्स विमा कंपनी यांच्या विरूध्द दावा दाखल करण्यात आला. विमा कंपनीतर्फे अॅड. जयंत फडके यांनी कामकाज पाहीले. सदर प्रकरण हे साक्षी पुराव्याच्या पायरीवर असतांना जळगांव शहर महानगर पालिका येथिल अकाउन्ट विभागातील कर्मचारी यांना मयताचे उत्पन्न सिध्द करण्यासाठी मे. कोर्टाने समंस काढले होते. मयताचे उत्पन्न हे साक्षी पुराव्यादरम्यान सिध्द होताच नुकसान भरपाईची आकडेवारी सरासरी कीती होऊ शकते याचा अंदाज घेत प्रकरणाला कोणताही विलंब न लावता लोकन्यालयाच्या माध्यमातुन सदर प्रकरणात 43 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश लोकन्यायालयाचे अध्यक्ष यांनी विमा कंपनीस केला.

माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ठरलेल्या धोरणानुसार नुकसान भरपाईची आकडेवारी व सरासरी चर्चेअंती ठरलेली आकडेवारी ही सारखीच येत असल्याने सदरच्या प्रकरणात मनपा कर्मचारी रेहानाबी तस्लीम शेख यांच्या वारसांना 43 लाख व तिच्या सोबत प्रवास करत असलेला तिचा 4 वर्षाचा नातु याला 4,50,000/- रूपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश विमा कंपनीला लोकन्यायालयाच्या अधिकृत पॅनलचे अध्यक्ष न्यायमुर्ती श्रीमती. एस. एन. मोरवाले यांनी योग्य ते आदेश पारित करत नुकसान भरपाईची रक्कम पक्षकाराला स्वाधीन केली. सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी अॅड. हेमंत आर. जाधव, अॅड. सुनिल चव्हाण, यांनी कामकाज पाहीले.

ईतर महत्वाच्या बातम्या 

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या २० गाड्या केल्या जप्त..

जळगाव शहर पोलिसांची कारवाई चोरीच्या १९ दुचाकी केल्या हस्तगत..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे