जळगाव

गोव्यात अपघातात मयत झालेल्या, बंगालच्या व्यक्तीच्या वारसास जळगाव लोकअदालतमध्ये २२,५००००/- नुकसान भरपाई..

साडेपाच महीन्यात मिळाली २२ लाख ५० हजार रूपये नुकसान भरपाई

जळगाव (प्रतिनिधी)- मुळ जलपाईगुडी पश्चिम बंगाल राज्य येथिल रहीवासी आशिष शहा अमन शहा हे ताजहॉटेल गोवा येथे कायम स्वरूपी नोकरीला होते दिनांक 08/02/2024 रोजी त्यांचा कोलवा (गोवा) पोलिस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात मृत्यु झाला होता. अपघातावेळी ते त्यांच्या स्कुटीने कामावरून घरी जात होते, त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक पासींगची इनोव्हा गाडीने त्यांना जोरदार धडक दिली व त्यांचा जागीच मृत्यु झाला. सदर अपघाता बाबत कोलावा पोलिस स्टेशन येथे अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. तसेच मयताचे भाऊ हे बंधन बँकेत नोकरी निमीत्त जळगांव येथे राहत असल्याने त्यांनी जळगांव येथिल मोटर अपघात दावा प्राधिकरण येथे त्यांच्या भावाच्या अपघाती निधनाबाबत नुकसान भरपाई रक्कम मिळणेकामी अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांचे मार्फत जळगांव येथे दावा दाखल केला. सदरचा अपघात हा सामनेवाला इनोव्हा गाडी कं KA-22- MB-0716 गाडी चालक रघुवेंद्र परशुराम साळुंके व मालक अनिल हनुमंतराव घोरपडे यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने व त्यांची गाडी आय.सी.आय.सी.आय लंबोर्ड जनरल इंश्युरंन्स कंपनी यांच्याकडुन विमाकृत असल्याने तीघान विरूध्द नुकसान भरपाई दावा दाखल करण्यात आला. गाडी चालक व मालक यांच्यातर्फे अॅड सुनिल तुकाराम चव्हाण यांनी म्हणने मांडले की, अपघात झाला असुन अपघातावेळी गाडीचा विमा वैध असल्याने नुकसान भरपाई रक्कम ही विमा कंपनीकडुन वसुल करण्यात यावी असा आदेश केला.

विमा कंपनीने प्रथम दर्शनीय सदर प्रकरणाची चौकसी केली व लोकन्यायालयाच्या माध्यमातुन त्यांच्या वकीलांसी चौकसी करून चर्चेअंती 22,50,000/- रूपये नुकसान भरपाई देण्याचा ठराव लोकन्यायालयाच्या समक्ष पारीत केला.

विशेष बाब म्हणजे घटना ही गोवा येथे दिनांक 08/02/2024 रोजी घडली होती. सदर प्रकरण मे. मोटार अपघात दावा प्राधिकरण दिनांक 06/05/2024 रोजी दाखल करण्यात आले व सदर प्रकरणाचा न्यायनिवाडा हा केवळ साडेपाच महीन्यात झाला. यासाठी स्वतः अर्जदारांनी लोकन्यायालयाच्या पॅनलचे आभार मानले. लोकन्यायालयाच्या अधिकृत पॅनलचे अध्यक्ष न्यायमुर्ती श्रीमान. बी. एस. वावरे यांनी योग्य ते आदेश पारित करत नुकसान भरपाईची रक्कम पक्षकाराला स्वाधीन केली. सदर प्रकरणात अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस महेंद्र चौधरी अॅड. हेमंत रामदास जाधव, यांनी कामकाज पाहीले.

ईतर महत्वाच्या बातम्या 

महानगरपालिकेच्या अपघातात मयत कर्मचाऱ्याच्या वारसांना 43 लाख नुकसान भरपाई रक्कम देण्याचे आदेश..

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या २० गाड्या केल्या जप्त..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे