ॲड.पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांची अपक्ष उमेदवारी अन माजी महापौर विष्णू भंगाळे यांची बिनविरोध ची संधी हुकली..

जळगाव – शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून शहरातून प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असून आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुक भाऊ दादांची बिनविरोध होण्यासाठी मोठी धावपळ बघायला मिळाली
यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो प्रभाग क्रमांक ५ अ मधील जागेचा या ठिकाणी जळगाव शहराचे माजी महापौर तथा नगरसेवक विष्णू रामदास बंगाळे हे सध्या विद्यमान नगरसेवक असून त्यांच्या विरोधात जळगाव शहर महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक स्व नरेंद्र अण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड पियुष नरेंद्र अण्णा पाटील यांनी थेट दंड थोपटले आहे.
नवखे बिनविरोध ज्येष्ठ सदस्य अपयशी :
एकीकडे जळगाव शहर महानगरपालिकेतील विविध प्रभागातील नवखे नगरसेवक हे बिनविरोध निघालेले असताना मात्र एकीकडे वर्षानुवर्ष नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या तसेच जळगाव शहर महानगरपालिकेचे सर्वोच्च पद महापौर म्हणून भूषविलेल्या विष्णू रामदास बंगाळे हे शिंदे गट शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे निकटवर्ती असताना देखील यांना हे शक्य होऊ शकलेले नाही यामुळे आता या प्रभागाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे याकडे लक्ष लागून आहे.