जळगाव

कानळदा रोड वर भीषण अपघात : भरधाव डंपरच्या धडकेत दोन तरुण ठार..

जळगाव – दि.१९ रोजी सायंकाळी कानळदा रोड वरील फुफनगरी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीस जोरदार धडक दिली. घडक इतकी जोरात होती की, दोघ तरुण जागीच ठार झाले. या अपघातात कृष्णा उर्फ अमोल आनंदा कोळी (वय ३०) व पंकज शंकर कोळी (वय २८) या दोघांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज कोळी व कृष्णा उर्फ अमोल कोळी हे दोघ मित्र सेंट्रीग कामासाठी जळगावात आले होते. कामावरून सुट्टी झाल्यानंतर ते दोघ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास (एमएच १९, एव्ही ३४४६) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. कानळदा रोडवरील फुफनगरी फाट्याजवळील वळणावरुन जात असतांना कानळद्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, झेड ८०६७) क्रमांकाच्या डबरच्या डंपरने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दोघ दुचाकीस्वार तरुणांना डंपरचे सुमारे शंभर मिटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. अपघाताची माहिती मिळताच घाडी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दुचाकी आणि डंपरच्या या अपघाताची भीषणता इतकी होती की, दुचाकीस्वार तरुण हे थेट डंपरच्या धडकेत त्या दोघांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर दुचाकीवरील एक जण हा दुचाकीच्या मागील चाकात अडकून गेला होता. अपघातात ठार झालेले दोघ युवक जीवलग मित्र होते. ते दोघे सेंट्रीग काम करुन ते कुटुंबाला हातभार लावित होते. ते घराकडे जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यापुर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, नागरिकांनी याठिकाणाहून दिवसभर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाळूचे डंपर आणि ट्रॅक्टर जात असतात असे म्हणत संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांनवर रोष व्यक्त केला. पोलिसांकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने अशा भीषण अपघाताच्या घटना देखील अनेकदा घडल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी केली होती. फुफनगरी व वडनगरी फाटया दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठे धोकेदायक वळण आहे. या गोलाकार वळणावर समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने याठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात. गेल्या वर्षभरात हा चौथा अपघात असून महाशिवरात्रीच्या दिवशी डीजेच्या वाहनाने तरुणाला चिरडले होते, तर जून महिन्यात दाम्पत्याला धडक दिल्याने ते दोघ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे