MIDC पोलिसांची सागर लॉजवर धाड ६ महिला व १ पुरुष ताब्यात मालक पसार….
जळगाव – येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या सागर हॉटेल व लॉज या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू होता. त्या ठिकाणी धाड टाकली असता सहा महिला व एक पुरुषाला ताब्यात घेण्यात आले. तर हॉटेल मालक हा फरार झालेला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.०६ रोजी पोलीस निरीक्षक, संदिप पाटील यांना सागर हॉटेल व लॉज येथे वेशा व्यवसाय चालत असल्याची गुप्त मिळली. सदर पोलीस स्टेशनला उपस्थित कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून त्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. एक डमी ग्राहक बोलावून सागर लॉज येथे पाठवला असता. सागर लॉज येथे वेशा व्यवसाय चालत असल्याची खात्री झाल्याने सागर लॉज येथे दुपारी छापा टाकण्यात आला.
तेथून ०६ महिला व ०१ ग्राहक व हॉटेल मॅनेजर कुनाल एकनाथ येरापले वय-२५ रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मिळुन आलेत. हॉटेल मॅनेजर यास लॉजचे मालक बाबत विचारणा केली असता त्याने लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे लॉज मध्ये वेशा व्यवसाय करीता बाहेरुन महिलांना बोलावून लॉज मध्ये वेशा व्यवसाय चालवितात असे मॅनेजर यांनी सांगीतले. हॉटेल मॅनेजर यास अटक केली असून हॉटेल मालक सागर सोनवणे हा पसार झाला आहे. सदर पिडीत महिलांची वैदयकिय तपासणी करुन त्यांना आशादिप वस्तीगृह जळगाव येथे दाखल केले. सागर लॉजचे मालक व मॅनेजर विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून. गुन्हयाचा तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.
ही कारवाई SDPO संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने केली.